रब्बी ज्वारी-फुलोरा व दाणे भरणे अवस्था
पाण्याची उपलब्धता असल्यास फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकास पाणी द्यावे.
हळद-काढणीपूर्व अवस्था
हळद पिकाच्या काढणीस साधारणतः फेब्रुवारी महिन्यात सुरूवात होते. काढणी करण्यापूर्वी 15 दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे.
केळी-वाढीची अवस्था
केळी बागेस 50 ग्रॅम पोटॅश प्रती झाड देऊन बागेस पाणी द्यावे.
आंबा-मोहर ते फुलधारणा अवस्था
आंबा फळबागेतील तुडतुड्यांंच्या व्यवस्थापनासाठी फवारणी केली नसल्यास पावसाचा अंदाज लक्षात घेऊन डायमिथोएट 30 टक्के 1320 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.
द्राक्ष-घड वाढीची अवस्था
द्राक्ष बागेत 00:00:50 या खत मात्रेची 6 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून पावसाचा अंदाज लक्षात घेऊन फवारणी करावी.
भाजीपाला-वाढीची अवस्था
गादी वाफ्यावर लागवड केलेल्या उन्हाळी भाजीपाला पिकांच्या रोपांची निगा राखावी. भाजीपाला पिकास पाणी व्यवस्थापन करावे.
फुलशेती-छाटणी अवस्था
छाटणी केलेल्या मोगरा बागेतील झाडांची अळी साफ करून जमिनीची मशागत करून अळ्यांची बांधणी करावी.
तुती रेशीम उद्योग-तुती लागवड करण्यासाठी शासनाने तुती बेणे ऐवजी तुतीरोपांपासून लागवड करावी, असे निर्बंध घातले आहेत. शेतकर्यांना तुती बेण्यापासून तुती रोपवाटीका 15 फेब्रुवारीपर्यंत तयार करता येईल आणि जुन महिन्यात त्याची पुनर्लागवड करता येईल.
पशुधन व्यवस्थापन-पोल्ट्री शेडमध्ये रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत तापमान 32.0 अंश सेल्सिअस ठेवण्यासाठी आवश्यकता असल्यास विद्युत बल्पचा वापर करावा.