पिकांच्या सद्याच्या अवस्थेनुसार कृषी तज्ज्ञांचा सल्ला

0

कापूस- वेचणी अवस्था
कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी. कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये.
तूर-फुलधारणा ते शेंगा धरणे अवस्था
तूर पिकावरील शेंगा पोखरणार्‍या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्केव 80 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 टक्केा 200 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी. तूर पिकास पंधरा दिवसांच्या अंतराने एक तास आड पाणी द्यावे.
मका–वाढीची अवस्था
मका पिकास पंधरा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. पिकास नत्राचा दुसरा हप्ता दिला नसल्यास 75 किलो नत्र प्रती हेक्टरी देऊन पाणी द्यावे. मका पिकावरील लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के 50 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.
हळद–कंद वाढीची अवस्था
हळद पिकावरील कंदमाशीच्या नियंत्रणासाठी उघडे पडलेले कंद झाकून घ्यावेत व क्लोरपायरीफॉस 50 टक्के 500 मिली प्रती एकर याप्रमाणात आळवणी करावी. हळद पिकास खत व्यवस्थापन करून पाणी द्यावे.
रब्बी ज्वारी–वाढीची अवस्था
बागायती रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास 40 किलो नत्र प्रती हेक्टरी युरीयाव्दारे देवून पिकास पाणी द्यावे. रब्बी ज्वारी पिकामधील खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रादुर्भावग्रस्त पोंगे काढून नष्टा करावीत व क्विनॉलफॉस 25 टक्के 600 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी. किटकनाशक पोंग्यात पडेल असे फवारावे.
रब्बी सूर्यफुल–वाढीची अवस्था
बागायती रब्बी सूर्यफुल पिकाची पेरणी करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास 30 किलो नत्र प्रती हेक्टरी युरीयाव्दारे देवून पिकास पाणी द्यावे.
रब्बी भुईमूग–वाढीची अवस्था
रब्बी भुईमूग पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास तुषार सिंचन पध्दतीने संरक्षित पाणी द्यावे.
केळी–वाढीची अवस्था
केळी बागेस पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीत ओलावा टिकून ठेवण्यासाठी बागेत आच्छादन करावे.
द्राक्ष–वाढीची अवस्था
पाण्याची उपलब्धता असल्यास छाटणी केलेल्या द्राक्ष बागेत पाणी व्यवस्थाापन करावे. तसेच पानांची विरळणी करावी.
भाजीपाला–वाढीची अवस्था
मिरची पिकावरील भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी सल्फर 80 टक्के डब्ल्युपी 25 ग्रॅम किंवा मायक्लोब्युटॅनील 10 टक्के डब्युपी 10 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लागवड केलेल्या भाजीपाला पिकास पाणी व्यवस्थापन करावे.
फुलशेती–वाढीची अवस्था -फुलपिकास पाणी व्यवस्थाापन करावे.
पशुधन व्यवस्थापन–थंडीमुळे जनावरांना (शेळ्या व मेंढ्यांना) सर्दीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास जनावरांच्या नाकात निलगीरीच्या तेलाचे दोन थेंब सोडावेत किंवा सूंट आणि गुळ खाऊ घालावे. शेळ्यांच्या पिल्लांना विक्सव्हेपोरपची वाफ द्यावी किंवा नाकपुडीस लावावे.

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

 

https://whatsapp.heeraagro.com

 

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
Leave A Reply

Your email address will not be published.