पिकांच्या सद्याच्या अवस्थेप्रमाणे कृषी तज्ज्ञांचा सल्ला

0

कापूस-वेचणी अवस्था
कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर पिकांचा पालापाचोळा, पर्‍हाट्यांची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी.

तूर -शेंगा भरणे अवस्था
तूर पिकावरील शेंगा पोखरणार्‍या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरॅनट्रानोलिप्रोल 18.5 टक्के 60 मिली किंवा क्लोरॅनट्रानोलिप्रोल 0.3 टक्के + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 4.6 टक्के 80 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी. तूर पिकास पंधरा दिवसाच्या अंतराने एक तास आड पाणी द्यावे.

मका-वाढीची अवस्था
मका पिकावरील लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी थायमिथॉक्झाम 12.6 टक्केा + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के 50 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.

रब्बी ज्वारी-वाढीची अवस्था
रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 12.6 टक्के + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के 50 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.

रब्बी भुईमूग-शेंगा भरणे अवस्था
रब्बी भुईमूग पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी.

हळद-वाढीची अवस्था
हळद पिकात पानावरील ठिपके रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझिम 10 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यायत मिसळून स्टीकरसह फवारणी करावी.

केळी-वाढीची अवस्था
केळी पिकावरील सिगाटोका लिफस्पॉट (करपा) रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनॅझोल 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

आंबा-मोहर धरणे
आंबा फळबागेत मोहर धरणे चालू झाले असल्यास तुडतूड्यांच्या व्यवस्था पनासाठी डायमिथोएट 30 टक्के 1320 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.

द्राक्ष-घड वाढीची अवस्था
द्राक्ष बागेत रोगांच्या नियंत्रणासाठी रोगनाशकाची फवारणी करावी.
भाजीपाला पुनर्लागवड- कोबीवर्गीय भाजीपाला पिकांची पुनर्लागवड करावी.

फुलशेती-वाढीची अवस्था
गलांडा फुलपिकात हिवाळ्यात मावा किड आढळून येते. नियंत्रणासाठी डायमेथोएट 1.0 मि. ली. प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

 

Leave A Reply

Your email address will not be published.