पिकाच्या अवस्थेप्रमाणे कृषी तज्ज्ञांचा सल्‍ला

0
कापूस-वेचणी अवस्था :
वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी. रसशोषन करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी क्लोथियानिडीन 50 टक्के 40 ग्रॅम किंवा स्पायरोमेसीफेन 22.9 टक्के 240 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी. कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये.
तूर- कळी ते फुलधारणा अवस्था :
तूर पिकावरील शेंगा पोखरणार्‍या हिरव्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पीक कळी अवस्थेत असताना हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत किंवा 5 टक्केे निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25 टक्केे 560 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी. पिकास उपलब्धतेनुसार व आवश्यकतेनुसार संरक्षित पाणी दयावे. तूर पिकास पोटॅशियम नायट्रेट (13:00:45) 150 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हळद- कंद वाढीची अवस्था
हळद पिकावरील कंदमाशीच्या नियंत्रणासाठी उघडे पडलेले कंद झाकून घ्यावेत. वेत व क्लोरपायरीफॉस 50 टक्के 500 मिली प्रती एकर याप्रमाणात आळवणी करावी. पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पाण्याच्या उपलब्धतेनुसार व आवश्यकतेनुसार पिकास पाणी द्यावे. हळद पिकात पानावरील ठिपके रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझिम 10 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यातत मिसळून फवारणी करावी.
रब्बी  ज्वोरी- पेरणी अवस्था
पाण्याची उपलब्धता असल्यास जमिनीस पाणी देऊन बागायती रब्बी ज्वारी पिकाची पेरणी 30 ऑक्टोाबरपर्यंत संपवावी. पेरणीपूर्वी बियाण्यास इमिडाक्लोप्रीड 48 टक्के 14 मिली प्रती किलो बियाण्यास बिजप्रक्रीया करावी. तसेच गंधक 300 मेश 4 ग्रॅम प्रती किलो बियाण्यास बिजप्रक्रीया करावी.
रब्बी सूर्यफूल- उगवण अवस्था
उगवून आलेल्या रब्बी सूर्यफूल पिकास संरक्षित पाणी द्यावे.
रब्बी  भुईमूग- वाढीची अवस्था
रब्बी भुईमूग पिकास तुषार सिंचन पध्दतीने संरक्षित पाणी द्यावे.
केळी-वाढीची अवस्था
केळी बागेस पाण्याचा ताण बसत असल्यास ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. जमिनीत ओलावा टिकून ठेवण्यासाठी बागेत आच्छादन करावे.
द्राक्ष-छाटणी अवस्था
पाण्याची उपलब्धता असल्यास द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी केली नसल्यास टप्याटप्याने बागेची छाटणी करावी.
सिताफळ- काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या सिताफळांची काढणी करून प्रतवारी करावी आणि बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावीत.
भाजीपाला – वाढीची अवस्था
भाजीपाला पिकावर रसशोषन करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास स्पायरोमेसिफेन 22.9 टक्के 160 ते 240 मिली किंवा फेनप्रोपॅथ्रीन 30 टक्के 70 मिली प्रती एकर याप्रमाणे स्टिकर मिसळून फवारावे. भाजीपाला पिकास उपलब्धतेनुसार व आवश्यकतेनुसार संरक्षित पाणी द्यावे.
फुलशेती- वाढीची अवस्था
फुलपिकास पाणी व्यावस्थापन करणे या काळात फायद्याचे ठरते.

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

https://whatsapp.heeraagro.com

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
Leave A Reply

Your email address will not be published.