पिकाच्या अवस्थेप्रमाणे कृषी तज्ज्ञांचा सल्ला

1

गहु= पूर्व मशागत
सद्यस्थितीत गहू पिकाची पेरणी करू नये. गहू पिकाच्या पेरणीसाठी जमीनीची 15 ते 20 सेमी. खोल नांगरणी करावी. तसेच वखराच्या तीन ते चार पाळ्या देऊन जमीन चांगली भूसभूशीत करावी. उपलब्धतेनुसार हेक्टरी 25 ते 30 गाड्या शेनखत मिसळून जमीन समपातळीत आणावी.
हरभरा= पेरणी अवस्था
पाण्याची उपलब्धता असल्यास जमीनीस पाणी देऊन हरभरा पिकाची पेरणी करावी. पेरणीपूर्व बियाण्यास थायरम 4 ग्रॅम प्रती किलो किंवा कार्बेंडेंझिम 2 ग्रॅम प्रती किलो याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
करडई = पेरणी अवस्था
पाण्याची उपलब्धता असल्यास जमिनीस पाणी देऊन करडई पिकाची पेरणी करावी. पेरणीपूर्व बियाण्यास थायरम 4 ग्रॅम प्रती किलो किंवा कार्बेंडॅझिम 2 ग्रॅम प्रती किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
ऊस= वाढीची अवस्था
ऊस पिकातील हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी जमीनीत ओल असताना फोरेट 10 टक्के दाणेदार हे किटकनाशक 25 किलो प्रती हेक्टरी टाकावे.
संत्रा किंवा मोसंबी=फळवाढीची अवस्था
संत्रा किंवा मोसंबी फळबागेत रसशोषण करणार्‍या किडींच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस 20 टक्के 400 मिली किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8 टक्के 60 मिली प्रतीएक्कर फवारावे. संत्रा किंवा मोसंबी बागेत फळांची गळती होत असल्यास जिब्रॅलीक अ‍ॅसिड 20 मिली ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी आणि बागेत पाणीव्यवस्थापन करावे.
डाळिंब= वाढीची अवस्था
मृगबहार डाळिंब बागेस पाणीव्यवस्थापन करावे. झाडावरील फुटवे काढून टाकावेत.
चिकू= वाढीची अवस्था
चिकू बागेस पाण्याचा ताण बसत असल्यास बागेस पुरेसे पाणी द्यावे.
फुलशेती = वाढीची अवस्था
फुलबागेस पाण्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करावे.
भाजीपाला= वाढीची अवस्था
भाजीपाला पिकावर रसशोषन करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास स्पायरोमेसिफेन 22.9 टक्के 160 तेे 240 किंवा फेनप्रोपॅथीन 30 टक्के 70 मिली प्रती एक्कर याप्रमाणे स्टिकर मिसळून फवारावे. भाजीपाला पिकास उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुसार संरक्षित पाणी द्यावे.
चारा पिके= लागवड
पाण्याची उपलब्धता असल्यास चार्‍यासाठी मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणार्‍या जमिनीत रब्बी हंगामात सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात ज्वारीची पेरणी करावी. लागवडीसाठी रुचिरा, मालदांडी, एम.पी.,चारी, फुले, अमृता इत्यादी जातींची निवड करावी.

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

https://whatsapp.heeraagro.com

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

1 Comment
  1. Anonymous says

    0.5

Leave A Reply

Your email address will not be published.