जमिनीचे 4 मुख्य घटक
खनिज पदार्थ :- जमिनीचा 45 टक्के भाग खनिज पदार्थानी व्यापलेला असतो. खनिज पदार्थामध्ये असणारी पदार्थानी मुख्य अन्नपदार्थ नत्र, स्फुरद, पालाश पिक वाढीच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. तसेच वाळु, अल्युमिनियम, लोह, क्लोरिन, जिप्सम, मीठ, तांबे इ. खनिज द्रव्ये जमिनीत सापडतात.
सेंद्रिय पदार्थ :- जमिनीचा फक्त 5 टक्के भाग सेंद्रिय पदार्थानी व्यापलेला असून हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्ध प्रमाणावर जमिनीचा पोत ठरतो.
“ जमिनीत जेव्हा सेंद्रिय पदार्थ पडतात. व त्यांचा पाण्याशी संपर्क आल्यानंतर जीवाणु त्याचे विघटन करतात. ते कुजवतात त्याना काळा रंग प्राप्त होतो. ह्या तयार होणा-या पदार्थाला ‘ह्यूमस’ असे म्हणतात. ह्यूमसमध्ये पाणी कार्बन डायऑक्साईड व इतर पीक वाढीचे अन्नघटक असतात.
पाणी :- जमिनीतील 25 टक्के भाग पाण्याने व्यापलेला असतो. पीक वाढीची आवश्यक अन्नद्रव्ये जमिनीतील पाण्यात विरघळता आणि पिकांना मुळाद्वारे शोषणास उपयोगी होतात. जमिनीतील पाण्याच्या प्रमाणावर पिकांचे उत्पन्न किंवा उत्पादन अवलंबून असते.
हवा :- जमिनीतील 25 टक्के भाग हवेने व्यापलेला असतो. जमिनीतील हवा आणि पाणी समप्रमाणात असणे यालाच जमिनीची वाफसा अवस्था असे म्हटले जाते. प्रामुख्याने जमिनीतील हवा सूक्ष्म सजीवाच्या वाढीसाठी आणि पीक वाढीसाठी उपयुक्त असते. जमिनीतील हवा म्हणजे ‘ऑक्सीजन’ होय. जर जमिनीत हवा खेळती राहिली नाही तर पिकांची वाढ खुटते. व मुळावर विविध रोग येतात. याशिवाय डायहायड्रोंक्सीस्टेरिक आम्ल,ल्युटेरिक आम्ल,लॅक्टिक आम्ल यासारखे विषारी घटक तयार होतात.