मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हाच्या चटक्याने विदर्भ, मराठवाडा होरपळला आहे, तर उत्तर महाराष्ट्र चांगलाच तापला आहे. गेल्या २४ तासात अकोल्यात राज्यातील उच्चांकी ४४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. राज्यात आजपासून तापमानाचा पारा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. मात्र या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढण्यास प्रतिकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर उत्तरेकडे सरकत जाताना हे कमी दाब क्षेत्र आणखी तीव्र होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
गेल्या २४ तासांमध्ये राजस्थानातील चुरू येथे देशातील उच्चांकी ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.९, जळगाव ४३.६, धुळे ४३.०, कोल्हापूर ३७.८, महाबळेश्वर ३२.१, मालेगाव ४२.२, नाशिक ३८.९, निफाड ३९.०, सांगली ३८.२, सोलापूर ४२.८, डहाणू ३४.७, सांताक्रूझ ३३.८, रत्नागिरी ३४.२, औरंगाबाद ४१.५, परभणी ४४.२, नांदेड ४४.०, अकोला ४४.८, अमरावती ४४.२, बुलडाणा ४१.०, ब्रह्मपुरी ४३.२, चंद्रपूर ४२.५, गोंदिया ४१.६, नागपूर ४३.२, वर्धा ४४.०.
ऊन तापदायक ठरणारी ठिकाणे
अकोला ४४.८, परभणी ४४.२, अमरावती ४४.२, नांदेड ४४, वर्धा ४४, जळगाव ४३.६, नागपूर ४३.२, ब्रह्मपुरी ४३.२, धुळे ४३.