राज्यात आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता

0

मुंबई: राज्यात सध्या पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. आज राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजा, जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

मध्यप्रदेशापासून महाराष्ट्र, दक्षिणअंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. परिणामी राज्यात पूर्वमोसमीचे ढग जमा होत असून, शुक्रवारी दुपारनंतर विदर्भ, मराठवाड्यात ढग जमा होऊ लागले होते. आज विदर्भ, मराठवाड्यासह, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे. 

गेल्या काही दिवसात राज्यातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मालेगावात होत आहे. कोकणासह कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, ब्रह्मपूरी, गोंदिया वगळता सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या पुढे गेला आहे. जळगाव, धुळे, मालेगाव, सोलापूर, अकोला, यवतमाळ येथे उन्हाचा चटका असह्य झाला आहे. राज्याच्या कमाल तापमानाचा पारा कमी अधिक होण्याची शक्यता आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.