यशोगाथा पपई लागवड

0

पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठी लाभकारी देखील आहे. पपई हे एक सहज पचणारे फळ आहे. पपई भूक आणि शक्ती वाढविते. पपईचा औषधी उपयोग आहे. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि कावीळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा या तालुक्यात कर्जई हे एक गाव आहे. येथील रहिवासी श्री. जयदेव उद्धव पाटील यांची २० एकर एवढी वडिलोपार्जीत शेती आहे. जयदेव पाटील हे प्राध्यापक म्हणून नोकरीवर आहेत. शिक्षकी पेशा सांभाळून शेती हा व्यवसाय देखील चांगल्याप्रकारे पुढे न्यावा असा निश्चय मनाशी बाळगून त्यांनी यासंबधी संपूर्ण अभ्यास करण्यास सुरवात केली. याअगोदर जयदेव पाटील हे पुण्याला प्राध्यापक म्हणून नोकरीला होते. कालांतराने त्यांना स्वतःच्या गावी नोकरी लागल्याने त्यांनी पुणे येथील नोकरी सोडली. येथे त्यांना आपल्या वडिलोपार्जीत शेतीकडे लक्ष देता आले. गावात पपई लागवड बऱ्यापैकी होत असल्यामुळे बऱ्याच लोकांकडून या पिकाविषयी संपूर्ण माहिती मिळविली त्याचा चांगला फायदा झाला. सोशल मिडीयावरून सरी काढणे याबाबत माहिती मिळविली. याचा त्यांना भरपूर उत्पादन घेण्यास फायदा झाला. पूर्ण शेतीमध्ये ठिबक लावली ज्यामुळे पाण्याची बचत देखील मोठ्या प्रमाणावर झाली. ठिबकमुळे कमी पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पिक घेता येते. श्री. जयदेव पाटील यांनी आपल्या २० एकर शेती मधून साडेतीन एकरात पपईची लागवड केली. त्यात पपईचे जवळपास २५०० झाडे आहेत. उर्वरित शेतीमध्ये त्यांनी उस तसेच काही ईतर पिकांची लागवड केली आहे. परंतु पपई या पिकांचे भरगोच्च उत्पादन मिळविण्यात यश आल्यामुळे यापुढे पपई लागवडीचा विस्तार करायचा आहे असे ते सांगतात.
शेती आणि नोकरी यांचा मेळ घालत त्यांनी इंटरनेट वरून पपई लागवडी संबधी विविध प्रकारची इतंभूत माहिती गोळा केली तसेच ते आपल्या काही शेतकरी मित्रांसोबत व्हॉट्स अप ग्रुपला जोडले गले आहे. शेतीविषयक भरपूर माहिती त्यांच्या या ग्रुप वर शेअर होत असल्यामुळे तेथील माहितीचा त्यांनी आपल्या शेतात यशस्वीपणे उपयोग केला. शेतीविषयक तज्ञांकडून बरीच माहिती प्राप्त केली. त्यांनी आपल्या संपूर्ण पपईसाठी जैविक खतांचा जास्तीत जास्त वापर केला. त्यांच्या पिकांसाठी त्यांनी कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करायचा नाही असा ठाम निश्चय केल्यामुळे त्यांना चांगली गुणवत्ता असलेले, भरपूर उत्पादन मिळाले. पपईच्या झाडांमध्ये योग्य तेवढे अंतर ठेवून तेथे कीड नियंत्रण म्हणून झेंडूच्या झाडांची यशस्वी लागवड केली. गावात त्यांनी एकट्यांनीच जैविक पपईची लागवड केली असल्याने पहिल्याच वर्षी त्यांना ईतर शेतकऱ्यांपेक्षा भरपूर उत्पादन प्राप्त झाले. पपईसाठी मजुरांची जास्त गरज भासत नसल्याने मजूर शोधत बसण्याची गरज उरत नाही. आतापर्यंत एकूण ७० टन एवढे पपईचे उत्पादन त्यांनी घेतले. सरी दिल्यामुळे पिकांची चांगली वाढ होऊन पपई लागवडीसाठी खर्च देखील कमी आला.
“नुसता विचार नाही तर कृती करावी” या उक्तीचा प्रत्यय जयदेव पाटील सरांचे काम पाहिल्यावर येतो.
तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन शेतकऱ्यासोबत. आपल्याला आमचा लेख आवडल्यास यास नक्कीच लाईक करा व आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

http://whatsapp.heeraagro.com/

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

Leave A Reply

Your email address will not be published.