उन्हाची तीव्रता वाढली

0

जळगाव : राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. सध्याचे हवामान पुर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

उन्हाची तीव्रता अजून काही दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जळगाव, सोलापूर, सांगली, परभणी, अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा येथे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. तर पुणे, मालेगाव, सातारा, नांदेड, ब्रह्मपुरी येथे तापमान ३७ अंशांच्या पुढे गेल्याने तेथे उन्हाचा चटका अधिकच वाढला आहे. राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 

वाढलेले तापमान आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता.४) विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.